स्मार्ट मीटर विरोधात पट्टणकोडोलीत महावितरण कार्यालयावर ग्रामस्थांचा मोर्चा
इचलकरंजी - महावितरणकडून सध्या स्मार्टमीटर बसवण्याची मोहिम सुरू आहे. मात्र याला हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली ग्रामस्थांनी विरोध केला आहे. ग्रामस्थांनी महावितरणच्या पट्टणकोडोली कार्यालयावर धडक देत संताप व्यक्त केला आहे. महावितरणचे ओंकार काळे आणि रोहीत कुलकर्णी यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. यावेळी कुलकर्णी यांनी, केंद्र शासनाचा जी आर दाखवत स्मार्ट मिटर सक्तीचे असल्याचे सांगितले. मात्र ग्रामस्थांनी आपला विरोध कायम ठेवला. स्मार्ट मिटर बसवण्याचे काम बंद करावे अन्यथा गाव बंद करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.