भारतीय हवामान विभागाने पावसाबाबत वर्तवली ‘ही’ शक्यता...
दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाज केला जाहीर
मुंबई – भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या पावसाबाबत दुसऱ्या टप्प्यातील जून ते सप्टेंबर या महिन्यातील सुधारित अंदाज वर्तवला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहणार असून सरासरीहून कमी पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सूनच्या हंगामात महाराष्ट्रासह देशातील काही भागात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती नोंदवली जाण्याची शक्यता आहे. देशात यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी म्हणजे सरासरीच्या ९० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वीच्या अंदाजात ९२ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. तो दोन टक्क्यांनी कमी करण्यात आला असून ९० टक्के असेल असा सुधारित अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जूनमध्ये पर्जन्यमान कमी असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.