जनगोंडा पाटील यांनी आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी काम केले : राजू शेट्टी
कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माणगावमधील कार्यकर्ते आणि सहकार तसेच शेतकरी चळवळीतील निस्वार्थी व्यक्तिमत्व स्वर्गीय जनगोंडा नेमगोंडा पाटील यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रमुख उपस्थिती होती. माणगाव येथील गांधी चौकात आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.
यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी, जनगोंडा पाटील यांनी १९७० सालापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी काम केले असल्याचे सांगितले.
यावेळी अनिल कांबळे, जिनगोंडा पाटील, जयकुमार कोले, झाकीर भालदार, सुरेश पाटील, राजगोंडा पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, शिवगोंडा पाटील, अरुण मगदूम, अभय व्हनवाडे, शिरीष मधाळे, भिकाजी शिगे, राजू मुगळखोड, शकील भालदार यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते.