कोल्हापुरात पर्यटकाचा ओघ वाढला ; काल एका दिवसात 88 हजार भाविकांनी देवीचं घेतलं दर्शन
कोल्हापूर – सुट्ट्यांचे दिवस सुरु असल्याने करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचा ओघ खूप वाढला आहे. देवीच्या दर्शनासह पर्यटक पन्हाळा, जोतीबा डोंगरासह रंकाळा तलावाला अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. काल एका दिवसात करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे 88 हजार 196 इतक्या भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे.