कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर अज्ञात वाहनाची दोन दुचाकींना धडक... तिघे जखमी

<p>कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर अज्ञात वाहनाची दोन दुचाकींना धडक... तिघे जखमी</p>

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील वाकरे येथील सरदार पाटील हे बुधवारी रात्री गॅरेज बंद करून गावाकडे निघाले होते. त्याचवेळी कोल्हापुरातील काम संपवून नानसिंग वास्किले  आणि सखाराम वास्किले हे कळे गावाकडे निघाले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर कोल्हापूरहून कोकणात जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने पाटील आणि वास्किले यांच्या दुचाकींना धडक दिली आहे. या अपघातात तिघेही जखमी झाले आहेत. यातील एकाला खासगी तर दोघांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.