देशाची एकात्मता, सुख-शांती अबाधित राहू दे म्हणत शहरात बकरी ईद साजरी  

<p>देशाची एकात्मता, सुख-शांती अबाधित राहू दे म्हणत शहरात बकरी ईद साजरी  </p>

कोल्हापूर – आज कोल्हापूर शहरातील मुस्लिम बांधवानी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. आज बकरी ईद निमित्त 
कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांनी दसरा चौक येथील  मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर एकत्र येत सामुदायिकरित्या नमाज पठन केले. यावेळी मुस्लिम बांधवांनी कोल्हापूरची आणि देशाची एकात्मता तसेच सुख- शांती अबाधित रहावी म्हणून प्रार्थना केली. पहिल्या जमातीला मुफ्ती इरशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन आणि नमाज पठन केले. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी  मुस्लिम बोर्डिंग पटांगणात सामुदायिक नमाज पठणासाठी हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले होते.