खरातच्या सिनेमावरून अभिनेत्री दीपाली सय्यदला धमकीचे फोन 

<p>खरातच्या सिनेमावरून अभिनेत्री दीपाली सय्यदला धमकीचे फोन </p>

मुंबई – काल एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी राज्यात गाजत असलेल्या नराधम अशोक खरात प्रकरणावर सिनेमा येत असल्याचे म्हटले आहे. तसेच या सिनेमात रुपाली चाकणकर यांची भूमिका त्या साकारणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावरून त्यांना राजकीय लोकांचे धमक्यांचे फोन येत असल्याचे दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 

रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये, असं म्हणत दीपाली सय्यद यांना धमक्या येत आहे. यावर त्यांनी म्हटले आहे कि, रोल करत असताना कोणीही कलाकारावर दबाव आणू नये. मला काही धमक्यांचे फोन येत आहेत, पण कर नाही त्याला डर कशाचा? हे माझं प्रोफेशन आहे आणि हे न करण्यासाठी जर मला फोन येत असतील तर हे चुकीचं आहे, असे म्हटले आहे. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी,सिनेमात कुणी काम करावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून  कुणीही यात राजकारण आणण्याचं कारण नाही, धमक्यांसंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.