आयपीएल बेटिंग प्रकरणी भाजपच्या ‘या’ नगरसेवकाला अटक... इचलकरंजीतील घटना   

<p>आयपीएल बेटिंग प्रकरणी भाजपच्या ‘या’ नगरसेवकाला अटक... इचलकरंजीतील घटना   </p>

इचलकरंजी - शहरातील गाजत असलेल्या आयपीएल बेटिंग प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपचे नगरसेवक नितेश उर्फ (गोट्या) पवार याच्यासह चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी सहा जणांना अटक करण्यात आली होती. अटकेतील आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.  पोलिसांचा तपास आता राजस्थानपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणात भाजपचा  नगरसेवक नितेश पवार याला  पोलिसांनी रात्री उशिरा अटक केल्यानंतर  शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर भाजपच्या काही नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे  काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.   मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत तपासाची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत तीन आलिशान गाड्या ,रोख रक्कम, मोबाईल लॅपटॉप असा लाख रुपयांचा  मुद्देमाल  जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने  सुरू असून आणखी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले  जाण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या बेटिंग रॅकेटचे धागेदोरे राजस्थानपर्यंत जोडले गेले असल्याचा  पोलिसांना संशय आहे. या कारवाईमुळे  राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांचा तपास आता राजस्थानपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्येही या बेटिंग नेटवर्कचे संबंध असल्याची शक्यता तपासली जात आहे.