‘Miss you काका’ : आ. रोहित पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबई – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला चार महिने पूर्ण झाले आहेत. परंतु त्यांच्या अपघाताचा पाठपुरावा अद्याप झाला नाही याची खंत व्यक्त करत आ. रोहित पवार यांनी ‘Miss you काका’ म्हणून फेसबुक पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओही पोस्ट केला आहे.
आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे कि, “तुम्हाला जाऊन ४ महिने झाले दादा, पण मन आजही तुमच्या एका हाकेसाठी आतुर आहे. ही पोकळी कधीही न भरून येणारी…” असे म्हटले आहे.
यावेळी त्यांनी अजित पवार आणि त्यांचा असलेला जिव्हाळा तसेच दोघांमधील नाते किती घट्ट होतं हे सांगण्याचा प्रयत्न व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. तसेच काही लोक तुमच्या नावाचा वापर स्वता:च्या स्वार्थासाठी करत आहेत, परंतु तुमच्या अपघाताचा निष्पक्ष तपास होत नाही, तसेच यातील जबाबदार लोकांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.