पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून ‘यांनी’ घेतली शपथ...
कोलकत्ता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 207 सदस्य निवडून आणून भाजपने बाजी मारली आहे. त्या अनुषंगाने आज भाजपचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी शपथ घेतली आहे.
कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राऊंडवर झालेल्या एका भव्य सोहळ्यात राज्यपाल आर. एन. रवि यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन नवीन, योगी आदित्यनाथ यांच्यासह महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सुमारे 20 राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याचे साक्षीदार बनले आहेत.