या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारने तात्काळ मुसक्या आवळाव्यात अन्यथा...: आ. रोहित पवार 

<p>या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारने तात्काळ मुसक्या आवळाव्यात अन्यथा...: आ. रोहित पवार </p>

मुंबई - राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याने राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यावर आ. रोहित पवार यांनी निषेध व्यक्त करत या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारने तत्काळ मुसक्या आवळाव्यात अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानेच केलेला हा हल्ला आहे, असे आम्ही समजू, असे त्यांनी म्हटले आहे. 
आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे कि,  "महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! असे हल्ले हे काही नवीन नाहीत. यापूर्वीही ज्ञानोबा-तुकोबांनाही मनुवादी वृत्तीने असंच छळलं होतं, त्यामुळं या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाहीत. हा हल्ला करताना लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांना तातडीने पोलीस संरक्षणही पुरवावे, यापुढं लवांडे यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, याची सरकारने नोंद घ्यावी", असेही त्यांनी म्हटले आहे.