आंबा वनपरिक्षेत्रातील ट्रॅप कॅमेरा चोरट्याला अटक...

<p>आंबा वनपरिक्षेत्रातील ट्रॅप कॅमेरा चोरट्याला अटक...</p>

कोल्हापूर - आंबा वनपरिक्षेत्रातील वन क्षेत्रात आग लावणे तसेच वन्य प्राणी गणनेसाठी बसवण्यात आलेले शासकीय ट्रॅप कॅमेरे चोरी प्रकरणी शाहुवाडी तालुक्यातील कोतोली धनगरवाडा येथील बापू चौगुले  या इसमाला आज वनविभागाने अटक केली आहे. 
आंबा वनपरिक्षेत्रात बसवण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याची चोरी करून जंगल क्षेत्रात आग लावणे. त्याचबरोबर  वन्यप्राण्यांच्या शिकार करण्याच्या उद्देशाने बापू चौगुले या इसमाला वन्य विभागाच्या पथकाने आज सापळा रुचून कोकरूड येथे ताब्यात घेतले आहे. आरोपीला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या समोर हजर केलं असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र  राखीवचे तुषार चव्हाण , उपसंचालक स्नेहलता पाटील, सहाय्य वनसंरक्षक संदेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक गोविंद पवार, मनीषा देसाई, राजेंद्र बनकर, विशाल पाटील, रोहिदास पडवळे, अनुजा नवले आदींनी कारवाई केली आहे.