खा. सुप्रिया सुळेंनी स्व. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट

<p>खा. सुप्रिया सुळेंनी स्व. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट</p>

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.

या भेटी दरम्यान डॉ. जयसिंगराव पवार यांची कन्या डॉ. मंजुश्री पवार यांच्याशी बोलताना त्यांनी डॉ. पवार यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार सुळे यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याचे सांगितले. महाराष्ट्राचा खरा इतिहास ते लोकांपर्यंत पोहचवत होते, आता ही जबाबदारी त्यांच्या कुटुंबियांवर असल्याची भावना खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे आदि उपस्थित होते.