उपवडे येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

<p>उपवडे येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या</p>

सांगरुळ - करवीर तालुक्यातील उपवडे येथील एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना गुरुवारी दुपारी घडली. सोनाबाई बबन पेंडुलकर (वय ३७) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाबाई यांनी आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील माळ्यावरील आड्याला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.