गोकुळ दूध संघाचा वाद पेटला : आ. शिवाजी पाटील समर्थक प्रकाश बेलवाडे यांच्यावर हल्ला

<p>गोकुळ दूध संघाचा वाद पेटला : आ. शिवाजी पाटील समर्थक प्रकाश बेलवाडे यांच्यावर हल्ला</p>

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या वादाला आता हिंसक वळण लागल्याचे चित्र समोर आले आहे. आमदार शिवाजी पाटील यांचे समर्थक तसेच गोकुळचे याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांच्यावर कागल टोलनाका येथे हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश बेलवाडे आणि वैभव यादव हे कोल्हापूरकडे येत असताना कागल टोलनाक्यावर काही अज्ञात लोकांनी त्यांना अडवून धक्काबुक्की आणि मारहाण केली आहे. या हल्ल्यात वैभव यादव जखमी झाल्याचे समजते. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वादातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.