एसआरआय मॅपिंगच्या कामासाठी मुदतवाढ देण्याची मनसेची मागणी
कोल्हापूर - शहरात सध्या एसआरआय अंतर्गत प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहोचून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या कामात नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आला आहे. ज्या बीएलओ ची नेमूणक करण्यात आली आहे, त्यांच्याकडे आधीच कामाचा ढीग आहे, त्यात या कामाची भर त्यामुळे हे काम दहा एप्रिल या नियोजित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या कामासाठी नव्वद दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी आणि कामात नियमितपणा असावा, अशा मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आल्या आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, अभिजीत पाटील, निलेश आजगावकर, अरविंद कांबळे, यतीन होरणे, विजय करजगार, राजन हुल्लोळी, उत्तम वंदुरे, सुनिल तुपे, राहुल पाटील, गणेश शिंदे, रोहीत कांबळे, गणेश सांगवडेकर, दिलीप पाटील, बाजीराव दिंडोर्ले, अजिंक्य शिंदे आदी उपस्थित होते.