१३ गावांच्या पाणी प्रश्नासाठी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर घागर मोर्चा... 

...अन्यथा आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवायची नाही : ऋतुराज पाटील यांचा अधिकाऱ्यांना इशारा 

<p>१३ गावांच्या पाणी प्रश्नासाठी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर घागर मोर्चा... </p>

कोल्हापूर – जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गांधीनगर प्रादेशिक १३ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील विलंब, निकृष्ट कामे आणि सतत खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक घागर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ऋतुराज पाटील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले.
१३ गावांमधील तीन लाख हून अधिक लोकांच्या पाण्याचा प्रश्न असून  ही योजना कधी पूर्ण होणार आहे, याचे लेखी आश्वासन देण्याची मागणी यावेळी ऋतुराज पाटील यांनी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी २७ जून पर्यंत ही योजना पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले. यावर २७ जून पर्यंत योजना पूर्ण न झाल्यास आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवायची नसल्याचा इशारा यावेळी ऋतुराज पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. 
या मोर्चात तेरा गावांतील जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.