संतापजनक : कोल्हापुरात नात्याला काळिमा फसणारी घडली घटना...
कोल्हापूर – पुण्यातील नसरापूरची घटना ताजी असताना कोल्हापुरात नात्याला काळिमा फसणारी घटना घडली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
मुलगी 9 वर्षांची असल्यापासून तिच्यावर वडिलांकडून अत्याचार होत होता. धक्कादायक म्हणजे मामा आणि मामेभावाने देखील गेल्या 5 वर्षांपासून तिचं लैंगिक शोषण केले आहे. ही पीडित मुलगी अल्पवयीन असून तिचं आता वय 15 वर्षांचं आहे. मुलीने आईला झालेल्या गोष्टी सांगितल्यावर आईने मुलीला घेऊन घर सोडलं आणि शाहूपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शाहूपुरी पोलिसांनी आरोपी बाप आणि मामाला अटक केली आहे. या प्रकरणी काल जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.