शाईफेक करणाऱ्या दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल... 

<p>शाईफेक करणाऱ्या दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल... </p>

पुणे – राष्ट्रवादी प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करणारे संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर या दोघांनी शाई फेक केली होती. 1959 च्या शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाई फेक करण्याआधी पिस्तूल दाखवल्याचा विकास लवांडे यांचा आरोप आहे.