अवैध व्यवसायाशी संबंध आढळल्याने कॉन्स्टेबल रोहित कदम निलंबित

<p>अवैध व्यवसायाशी संबंध आढळल्याने कॉन्स्टेबल रोहित कदम निलंबित</p>

कोल्हापूर -  करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांना एक पंटर देखील मिळून आला होता. या छाप्यावेळी मिळून आलेल्या डायरीत काही पोलिसांची नावे आढळून आली आहेत. अवैध व्यवसायाशी संबंधित व्यक्तीसोबत कॉन्स्टेबल रोहित कदम यांचे व्यवहार आढळून आल्याने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी करवीर पोलीस उपाधीक्षक कार्यालयाकडील कॉन्स्टेबल रोहित कदम याला निलंबित केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.