अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाई अन् सुपारी फेकल्या...पाच जण ताब्यात

<p>अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाई अन् सुपारी फेकल्या...पाच जण ताब्यात</p>

जालना – आज जालन्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाई आणि सुपारी फेकल्या आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या गाडीत गुणरत्न सदावर्तेंसह त्यांची  पत्नी आणि मुलगी होती.

मागील काही दिवसांपूर्वी मुंबईतील रिक्षा चालकांच्या संदर्भात मराठी आणि अमराठी या वादावर गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर  टीका केली होती. यावर जालन्यात मनसैनिक आक्रमक झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या  पाच जणांना ताब्यात घेतले आहे.