ओबीसी युवक मंचच्यावतीने राज्यस्तरीय ओबीसी युवक कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
पुणे - ओबीसी समाजातील युवकांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच आगामी सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर सखोल चर्चा करण्याच्या उद्देशाने ओबीसी युवक मंचच्यावतीने राज्यस्तरीय ओबीसी युवक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत युवक - युवतींना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील, माजी आमदार दिप्तीताई चौधरी, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेस प्रवक्ते हणमंत पवार, भाउसाहेब आजबे, गटनेता चंदुशेठ कदम, नगरसेविका दिपाली डोख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ आमराळे, पवन खरात, अनिकेत गावडे यांच्यासह राज्यभरातील ओबीसी विभागाचे पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.