शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाई फेकून धक्काबुक्की…
पुणे – वारकरी संप्रदायावर टीका केल्या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाई फेकून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. संग्राम महाराज भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आळंदी मातोबा येथून प्रवचन आटोपल्यानंतर विकास लवांडे परतत होते. आज सकाळी सुमारे दहाच्या सुमारास काही जणांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून वाहन अडवले. त्यानंतर त्यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली आहे.
'वारकरी संप्रदायावर टीका करताना विकास लवांडेंनी घुसखोर असा शब्द वापरला होता. गुरुवर्यांसाठी अशा शब्दांचा वापर केला पाहिजे नव्हता', असे संग्राम महाराज भंडारेंनी म्हटले आहे.