रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खा. शरद पवार यांची पुन्हा एकदा वर्णी...

<p>रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खा. शरद पवार यांची पुन्हा एकदा वर्णी...</p>

सातारा – रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खा. शरद पवार यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. सन 2026 ते 2029 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी शरद पवार हेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असणार आहेत. आज खा. शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावत भाषण केले.  

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान अध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे शरद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना खा. शरद पवार म्हणाले की, आपण कुठं कमी पडलो, नवीन काय करता येईल, याबाबत आपण विचार करायला हवा. सर्वसामान्य लोकांसाठी कर्मवीरांनी आदर्श दिला, तोच आदर्श आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. संस्थेसाठी अखंड काम करणारे आहेत, म्हणून आज संस्थेची उंची वाढली आहे.  सर्व सेवकांचे मी अंतःकरणापासून आभार मानतो, असे त्यांनी भाषण केले आहे.