‘या’ परिवहन महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय...
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार वाढ
हैदराबाद – तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाने परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सर्व सेवासुविधा मिळणार आहेत. तसेच वेतनात १० ते ११ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. तसेच तेलंगणा परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या ३२ पैकी ३१ मागण्या तेलंगणा राज्य सरकारने मान्य केल्या आहेत.