पन्हाळा तालुक्यातील गोठे परिसरात गव्यांचा धुमाकुळ... 

शेती पिकांचे नुकसान

<p>पन्हाळा तालुक्यातील गोठे परिसरात गव्यांचा धुमाकुळ... </p>

कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील गोठे गावाशेजारी वन विभागाचे जंगल क्षेत्र आहे. पाच वर्षा पूर्वी याठिकाणी प्राण्यांचा कोणताही त्रास नव्हता. दरम्यान या जंगलातून मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाल्यापासून वन्यप्राणी शेतवडीत येणाऱ्यास सुरुवात झाली आहे. गावातल्या शेतकऱ्यांची एक गुंठ्या पासून ते तीन ते चार एकर शेती आहे. गेल्या काही वर्षांपासून गवरेड्यांचा कळप शेतामध्ये येऊन भात,  मक्का आणि ऊस पिकाचे नुकसान करत आहेत. या नुकसानीची वन विभागाकडून अतिशय तुटपुंजी मदत मिळते आहे.

वनविभागाकडून एका गुंठ्यांतील उसाला १२९०, मक्याला ५१० तर भाताला ३७७ रु प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते. मात्र उर्वरित ६०% नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. त्यामुळे आम्ही जगायचे की मरायचे असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून गवरेड्याचा कायमचा बंदोस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.