एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या गर्जना करणारे पडळकर, खोत, सदावर्ते हे का गप्प आहेत..?
तेलंगणा सरकारच्या निर्णयावर काँग्रेसचा सवाल
मुंबई – तेलंगणा राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत समावेश करून घेतले आहे. यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत यांनी, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या गर्जना करणारे गोपीचंद पडळकर, सदा खोत, गुणरत्न सदावर्ते हे का गप्प आहेत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील एस.टी. महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांचा पक्ष महाराष्ट्रात सत्ता असतानाही राज्यात एसटी महामंडळ शासनात कधी विलीन करणार?, एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमधील विलीनीकरणाबाबत काहीही का बोलत नाहीत, अशी टीका त्यांनी भाजपच्या नेत्यावर केली आहे.