कोल्हापुरात घुमणार स्वामी नामाचा 'रॅप'
कोल्हापूर – शहरातील स्वामी समर्थांवर आधारित एक विशेष 'रॅप साँग' प्रदर्शित होत आहे. यामुळे ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांची महती आता केवळ अभंग आणि आरती यामधूनच नाही, तर रॅप संगीताच्या माध्यमातून तरुणाईपर्यंत पोहोचणार आहे. कोल्हापूरच्या कलाकारांनी एक पाऊल पुढे टाकत, स्वामींची भक्ती चक्क 'रॅप' स्वरूपात मांडली आहे. या गाण्याचे चित्रीकरण अक्कलकोट, सांगोला, कोल्हापूर याठिकाणी झाले आहे. प्रेक्षकांना या नवीन गोष्टी नक्की आवडतील, अशी प्रतिक्रिया मुख्य कलाकार तेजश्री मोरे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली आहे.
या रॅप साँगमध्ये तेजश्री मोरे, सोनम धनकुटे, नंदकुमार नीलकंठ, विशाल खांडेकर, बाल कलाकार वेदांत खांडेकर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हे गाणे २४ मे ला लाँच होणार आहे.