प्रतिभानगरात चोरी... 

१० लाखाचे दागिने लंपास...घरकाम करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

<p>प्रतिभानगरात चोरी... </p>

कोल्हापूर – शहरातील प्रतिभानगर येथे १० लाखाच्या दागिन्याची चोरी झाली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

राहुल नारायण हावळ हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्रतिभा नगर येथील नलवडे कॉलनीत राहत होते. या दोन महिन्यांच्या काळात त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सुमारे दहा लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले आहे. दरम्यान या प्रकरणी राहुल हावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या घरात काम करणाऱ्या वैशाली भूमनावर हिच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.