…यामागे छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला कमी लेखण्याचा प्रयत्न : आ. सतेज पाटील
कोल्हापूर - एका कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावर आ. सतेज पाटील यांनी फेसबुक पोस्ट करून, “शिवराय थकले आणि त्यांनी राजपाट समर्थांकडे दिला” हे विधान ऐतिहासिकदृष्ट्या निराधार आहेच पण यामागे छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. तो कदापी खपवून घेतला जाणार नाही”, असा संताप व्यक्त केला आहे.
स्वराज्य हे कोणाच्या कृपेवर किंवा दयेवर मिळालं नसून छत्रपती शिवरायांच्या अदम्य इच्छाशक्तीवर मिळालेलं आहे. आयुष्यभर केलेला संघर्ष, संघटन आणि कर्तृत्वाच्या बळावर स्वराज्य स्थापन झाले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.