दिल्लीहून स्वित्झर्लंडकडे जाणाऱ्या  विमानाच्या  पंख्यातून अचानक धूर...

<p>दिल्लीहून स्वित्झर्लंडकडे जाणाऱ्या  विमानाच्या  पंख्यातून अचानक धूर...</p>

नवी दिल्ली – आज दिल्लीहून स्वित्झर्लंडच्या  झ्युरिक येथे जाणाऱ्या विमानाच्या डाव्या पंख्यातून अचानक धूर आल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी   स्विस एअरचे विमान SWR146 टेकऑफच्या वेळी इंजिन निकामी झाल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली आहे.

 विमानातील सर्व प्रवाशांना आपत्कालीन स्लाईड्सच्या सहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.  या विमानात  232 प्रवासी आणि 13 कर्मचारी होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, विमानतळ प्रशासनाने तात्काळ संपूर्ण परिसरात आणीबाणी जाहीर केली आहे.