अर्धवट माहितीच्या आधारे कोणी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये : खा. डॉ. अमोल कोल्हेंचा संताप
मुंबई - बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे कि, ''मुघली आक्रमणासमोर उत्तर भारताने पळी पंचपात्र दडवून मान झुकवलेली असताना, सह्याद्रीच्या कातळावर तलवारीच्या पात्याने इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला उत्तरेतून येऊन चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे कोणी छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये. शिवविचारांवर पिंड पोसलेल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आराध्य दैवत नाहीत तर आमची अस्मिता, स्वाभिमान आणि ओळख आहेत. काल, आज आणि उद्याही! जय शिवराय!"