रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी आणि मडूरकर फाऊंडेशनच्यावतीने पुरस्कारांचे वितरण…

<p>रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी आणि मडूरकर फाऊंडेशनच्यावतीने पुरस्कारांचे वितरण…</p>

कोल्हापूर - रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी आणि मडूरकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कला, संस्कृती आणि संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव केला जातो. त्यानुसार नागाळा पार्क येथील  रोटरी समाजसेवा केंद्रात आयोजित कार्यक्रमात न्यु एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विनोद लोहिया यांच्या हस्ते शास्त्रीय संगीतमधील योगदानासाठी पंडित ईश्वरा चिले यांना संगीत मैत्र आणि चित्रकलेसाठी डेळेकर यांना कलामैत्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना लोहिया यांनी, कला आणि संगीत समाजाला जोडण्याचे काम करत असते असे सांगून मडूरकर फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. या सोहळ्याला फाउंडेशनचे संस्थापक सचिन मडूरकर, नगरसेवक विशाल चव्हाण, महेंद्र कानडे, प्रशांत शालिनकर, रेखा चिले, वंदना डेळेकर, महेश ढवळे, संजय रणदिवे, राजू जोशी आदि उपस्थित होते.