विनाअनुदानित शाळा समन्वय समितीच्या आंदोलनाला कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा

<p>विनाअनुदानित शाळा समन्वय समितीच्या आंदोलनाला कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा</p>

कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा समन्वय समितीच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानावर टप्पा अनुदान मिळावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. शिक्षक मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात झालेल्या व्यासपीठाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एक जुलैला व्यासपीठातंर्गत सर्व संघटनाचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी, त्याचबरोबर जिल्ह्यातील शंभर टक्के अनुदानित शाळांतील प्रत्येकी दोन प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होतील, अशी घोषणा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केली.

या  समिच्या अध्यक्षस्थानी एस. डी. लाड होते. त्याचबरोबर टीईटी पेपर फुटी प्रकरणी पूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी या सभेत करण्यात आली.

यावेळी चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, बी जी बोराडे, प्रा. सी. एम. गायकवाड, बाबा पाटील, सुधाकर निर्मळे, राजेश वरक, एन. आर. भोसले, राजेंद्र कोरे, इरफान अन्सारी, मनोहर जाधव, सुभाष खामकर, के. एस. मगदूम, डी. ए. चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.