...ही तर युवकांच्या भविष्याची चोरी : खा. राहुल गांधींचा टीईटी पेपर फुटीवर संताप 

<p>...ही तर युवकांच्या भविष्याची चोरी : खा. राहुल गांधींचा टीईटी पेपर फुटीवर संताप </p>

नवी दिल्ली – राज्यात टीईटी पेपर फुटल्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील आणखी एक घोळ समोर आला आहे. या वेळेस तर शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचाच पेपर फुटल्यामुळे राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, ही फक्त पेपर फुटी नाही तर, युवकांच्या भविष्याची चोरी असल्याचा संताप व्यक्त केला आहे. 
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे कि, देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेला वसुलीची प्रक्रिया बनवली आहे. ज्यामुळे देशाचा प्रत्येक युवक असुरक्षित आहे.