विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या नराधमांना थेट जेलमध्ये टाका : अमित ठाकरेंची मागणी 

<p>विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या नराधमांना थेट जेलमध्ये टाका : अमित ठाकरेंची मागणी </p>

मुंबई – राज्यात टीईटी पेपर फुटल्यामुळे सर्व स्तरातून टीका होत आहे. यावर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी, “किमान आता तरी तुमचं घाणेरडं राजकारण आणि पोकळ भाषणं बाजूला ठेवा. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या नराधमांना थेट जेलमध्ये टाका,” अशी मागणी केली आहे.
 “तुमची एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही? तुमची सिस्टीम एवढी सडलीये का?” असा प्रश्न विचारत अमित ठाकरे यांनी, सरकारकडून केल्या जाणाऱ्या कडक कायद्यांच्या गप्पा केवळ मंत्रालयाच्या कपाटात सजवण्यासाठी आहेत का, असा टोला लगावला आहे. तरुणांचा संयम सुटल्यास सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.