व्हिडिओ बॉम्बनंतर कोल्हापुरात नव्या चर्चांना उधाण; आमदार राजेश क्षीरसागर, गोदरेज साहित्य खरेदी आणि केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरणाचा काही संबंध?

<p>व्हिडिओ बॉम्बनंतर कोल्हापुरात नव्या चर्चांना उधाण; आमदार राजेश क्षीरसागर, गोदरेज साहित्य खरेदी आणि केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरणाचा काही संबंध?</p>

कोल्हापूर - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूरातील नेते रवीकिरण इंगवले यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात एक कथित व्हिडिओ बॉम्ब टाकून तोफ डागलीय. या व्हिडिओमध्ये आमदार क्षीरसागर यांनी ४० लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

या घडामोडीनंतर कोल्हापुरात विविध चर्चांना उधाण आलंय. विशेषतः केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामात गोदरेज कंपनीचे साऊंड सिस्टिम व अन्य साहित्य बसविण्यात आल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर आलीय. दरम्यान, सार्वजनिक झालेल्या कथित व्हिडिओचा आणि केशवराव भोसले नाट्यगृहातील साहित्य खरेदी किंवा संबंधित ठेकेदारांशी काही संबंध आहे का, याबाबत शहरात तर्क-वितर्क रंगू लागले आहेत. काहीजण या कथित व्यवहाराची किनार नाट्यगृहाच्या नूतनीकरणाशी जोडून पाहत असले, तरी याबाबत कोणताही अधिकृत पुरावा किंवा पुष्टी अद्याप समोर आलेली नाही. संबंधित व्हिडिओतील आरोपांची सत्यता, त्यामागील व्यवहार आणि त्याचा नाट्यगृहाच्या कामाशी काही संबंध आहे का, याबाबत अधिकृत चौकशी किंवा सक्षम यंत्रणांकडून कोणतीही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.