इचलकरंजीत सोशल मीडियाद्वारे महिलांची फसवणूक करणाऱ्याला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिला चोप

<p>इचलकरंजीत सोशल मीडियाद्वारे महिलांची फसवणूक करणाऱ्याला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिला चोप</p>

इचलकरंजी - दोघा सख्ख्या भावांनी सोशल मीडियावर बनावट ओळख निर्माण करून महिलांशी आणि मुलींशी संपर्क साधत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार इचलकरंजीत घडला आहे. यातील एका विरोधात यापूर्वीही अशाच प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्याची चर्चा परिसरात आहे. याची माहिती मिळताच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संबंधितांच्या घराजवळ जाऊन त्यापैकी एकाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात करत एकाला ताब्यात घेऊन मोबाईल फोन तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.

 घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने त्याठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे.