...मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? : राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना खरमरीत सवाल 

<p>...मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? : राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना खरमरीत सवाल </p>

मुंबई – दोन – तीन दिवसांपूर्वी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे संघाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी नांगरे पाटील  यांनी संघांचे तोंडभरून कौतुक केले. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे. 

२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्चात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ?, असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. 
राज ठाकरे यांनी म्हटले आहे कि, संघाच्या कार्यक्रमात नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल. 
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं.