टीईटी पेपर फुटी प्रकरणी तिघांना अटक...
ठाणे – टीईटीचा पेपर फुटल्यामुळे लाखो शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. या पेपर फुटी प्रकरणी पोलिसांनी सध्या तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोनगाव येथील डायमंड हॉटेलमध्ये पेपरफुटी संदर्भात संशयित असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार कोनगाव पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाले. मात्र, हे संशयित त्या ठिकाणी आढळून आले नाहीत. त्यानंतर, पोलिसांच्या पथकाने सहारा एअरपोर्ट परिसरातून तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या पेपरचे प्रश्न आढळून आले आहेत.