रायगडावर 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात...
रायगड – आज तिथीनुसार किल्ले रायगडवर 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
ब्रह्मवृंद यांच्या वेदमंत्र आणि मंत्रोच्चाराने सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी गडावर पारंपरिक धार्मिक विधी, पूजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यादरम्यान संपूर्ण रायगड परिसर 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवप्रेमी आणि पर्यटक रायगडावर दाखल झाले होते.