आ. राजेश क्षीरसागर हे शक्तीपीठ महामार्गाचे समर्थन का करत आहेत याचं उत्तर या व्हीडीओतून मिळालं : राजू शेट्टी
बोलावं
असा टोला त्यांनी _ शेवटी
कोल्हापूर – आज ठाकरे गटाचे नेते रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेवून आमदार राजेश क्षीरसागर हे ठेकेदाराकडून टक्केवारी घेवून काम करणारे भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी असल्याचा आरोप करत त्यांचा टक्केवारी बद्दलचा व्हिडिओ माध्यमांसमोर प्रसिध्द केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावरून सवाल उपस्थित करत आ. राजेश क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राजू शेट्टी यांनी म्हटले आहे कि, आमदार राजेश क्षीरसागर हे शक्तीपीठ महामार्गाचे समर्थन का करत आहेत याचं उत्तर या व्हीडीओतून मिळाले ? कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व जनता महापूराच्या खाईत लोटली तरी चालेल पण टक्केवारी पै आणि पै मिळालीच पाहिजे. यासाठीच शक्तीपीठ महामार्गााचा अट्टाहास हे महाशय करत असावेत. बाकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भ्रष्ट्र लोकांच्यावर कारवाई करण्याची हिंम्मत नाही कारण ते या सर्वांचे वस्ताद आहेत. बाकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय बोलावं समृध्दी महामार्गाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांना लगावला आहे.