खळबळजनक : राज्यात टीईटीचा पेपर फुटला...
ठाणे - उद्या शेकडो शिक्षकांची टीईटी परीक्षा होणार आहे. त्यासाठी परीक्षा केंद्रांवर जय्यत तयारी सुरु असताना राज्यात पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. नीट पेपर फुटीचा घोळ चर्चेत असताना शिक्षक पात्रतेचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे.
ठाण्यात टीईटीचा पेपर फुटला आहे. त्यामुळे उद्या होणारी टीईटी परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेकडो शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. नीट पाठोपाठ टीईटीचा पेपर फुटल्याने सरकारचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे