कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत एचपी गॅस पाईपलाईनला भीषण आग...

<p>कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत एचपी गॅस पाईपलाईनला भीषण आग...</p>

कोल्हापूर - कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सोक्टास इंडस्ट्रीजजवळ शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एचपी गॅसच्या वितरण पाईपलाईनला गळती लागली. गळती होत असतानाच गॅसने पेट घेतल्याने आगीच्या प्रचंड ज्वाळा हवेत उसळल्या.

 घटनेची माहिती मिळताच कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खबरदारी म्हणून परिसरातील नागरिक आणि विविध उद्योगांतील कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान गॅस पुरवठ्याचा मुख्य व्हॉल्व तात्काळ बंद करून अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर गळतीच्या ठिकाणाची दुरुस्ती करून जेसीबीच्या साहाय्याने तो भाग तातडीने बुजवण्यात आला. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली.