एसआयआर मोहिमेची मुदत वाढवावी : आ. सतेज पाटील
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ३४ लाख मतदार असून, त्यापैकी आतापर्यंत ११.९९ टक्के म्हणजेच सुमारे ३ लाख ३७ हजार मतदारांचे मॅपिंग झालेले नाही. या मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना आमदार सतेज पाटील यांनी बैठकीत दिल्या.
इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज कोल्हापूरात काँग्रेस कमिटी कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत एसआयआर मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. मोहिमेदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पुष्पराज देशपांडे, ऋषिकेश पाटील, वेदवती मोहिते आणि इतर पदाधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. बीएलए पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदारापर्यंत ईएफ फॉर्म पोहोचवणे, फॉर्म भरण्यास मदत करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे तसेच बीएलओंच्या कामावर समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओंची संख्या अपुरी असल्याने सर्व मतदारांपर्यंत वेळेत पोहोचणे कठीण होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अधिकाधिक बीएलए नियुक्त करण्याची गरज असल्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, सध्या बीएलओंची संख्या अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. पावसाळ्यामुळे घराघरांत जाणे अधिक कठीण होणार असून, विशेषतः महिला बीएलओंना संध्याकाळनंतर काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे एसआयआर मोहिमेची मुदत वाढवावी, अधिक बीएलओ नियुक्त करावेत आणि प्रशासनाने जाहिराती, डिजिटल बोर्ड तसेच विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांनीही लक्ष घालून आवश्यक निर्णय घ्यावेत, असे आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, कॉम्रेड उदय नारकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोद्रे, कॉम्रेड दिलीप पोवार, सतीशचंद्र कांबळे, अनिल घाटगे, रामराजे कुपेकर, बाबासाहेब देवकर, अनिल लवेकर, कॉम्रेड चंद्रकांत यादव, शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, राहुल देसाई, बाळासाहेब सरनाईक, उमेश पवार, सयाजीराव झुंजार, नगरसेवक दुर्वास कदम, भारती पोवार, सरलाताई पाटील, भरत रसाळे, उदय गायकवाड, विजय घारे, युवराज गवळी, अशोक माळी, विजय कांबळे, युवराज मोरे, अनिल सोलापूरे, बयाजी शेळके, संजय पटकारे, संजय शेटे, मुस्ताक मलबारी, रफिक शेख, तुकाराम लाखे, सुनीता पाटील जिजाऊ ब्रिगेड, मोहन हजारे, एकनाथ कुंभार, अनिल लवेकर, राहुल पोवार, मामा भोसले, राजाराम वरूटे यांच्यासह इंडिया आघाडीतील घटकपक्षांचे कार्यकर्ते आजी - माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.