व्हिडिओ पार्लरच्या नावाखाली जुगार : माजी नगरसेवकांसह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर - शहरातील रंकाळा स्टँड परिसरात व्हिडिओ पार्लरच्या नावाखाली जुगार सुरू असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला.
यावेळी पार्लरमध्ये ५ जण पैसे टाकून व्हिडिओ गेम मशीनवर खेळत असल्याचे दिसून आले. या कारवाईत माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाणसह रुद्राक्ष जानकर, ओंकार पाटील, सुबोध आमते, सचिन गोसावी, अजित गोसावी आणि जागा मालक कल्याणी जाधव यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वीस व्हिडिओ गेम मशिन, ३ डिव्हिआर, रोख रक्कम, असा सुमारे साडेचार लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.