कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरातल्या जुन्या घराची भिंत कोसळली...

<p>कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरातल्या जुन्या घराची भिंत कोसळली...</p>

कोल्हापूर – शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील गंजी गल्लीत अब्दुल मणेर यांच्या मालकीचे दगड - विटा मातीचे जुने घर आहे. ही इमारत धोकादायक असल्याने महापालिकेने मनेर यांना नोटीस देऊन सुरक्षित ठिकाणी जाण्याचे तसेच धोकादायक अवस्थेतील इमारत उतरून घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज दुपारी मणेर कुटुंबियांकडून धोकादायक इमारत उतरून घेण्याचे काम करण्यात येणार होत. तत्पूर्वी अचानक या धोकादायक अवस्थेतील बंद घराची भिंत कोसळली. या परिसरात अरुंद रस्ता असून आजूबाजूला दुकाने असल्याने याठिकाणी नेहमी वर्दळ असते. आज रविवार असल्याने शिवण कामाची दुकान बंद होती. त्यामुळे वर्दळ नसल्याने पुढील अनर्थ टळला आहे.