कोल्हापुरातील ‘या’ ५ सायकलपटूंकडून कोल्हापूर ते रायगड सायकल प्रवास सुरु...

<p>कोल्हापुरातील ‘या’ ५ सायकलपटूंकडून कोल्हापूर ते रायगड सायकल प्रवास सुरु...</p>

कोल्हापूर -  ५ जून जागतिक पर्यावरण दिन आणि ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्यावतीने कोल्हापूर ते रायगड सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहेत. दत्तात्रय चौगुले, राम कारंडे, प्रकाश ओतारी, जयदिप पाटील  आणि अमर शिंदे हे या  मोहिमेतून प्लॅस्टिकमुक्त परिसर, जल संवर्धन, वृक्ष संवर्धन, सायकल चालवा, इंधन वाचवा आणि तंदुरुस्त रहा, असा संदेश पोहचवणार आहेत.

आज सकाळी दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते या सायकल मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश वरक, गिरीश नार्वेकर, उमेश देसाई, नागेश हंकारे, रितेश माने उपस्थित होते.