प्रख्यात चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचे निधन
मुंबई - प्रख्यात चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे आज मुंबईत निधन झाले आहे. यावेळी त्यांचे वय 79 वर्ष होते. पहलाज निहलानी हे गेल्या काही दिवसांपासून यकृताच्या आजारांशी लढत होते. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते.
पहलाज निहलानी यांनी 1982 मध्ये 'हथकडी' या सिनेमाद्वारे निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी 'आँखे', 'अंदाज', 'शोला और शबनम', 'तलाश', 'रंगीला राजा' आणि 'ज्युली 2' यासारखे अनेक हिट सिनेमे दिले. गोविंदा आणि दिव्या भारती ही पहलाज निहलानी यांची आवडती जोडी होती. त्यांनी या दोघांसोबत अनेक सिनेमे केले.