इनरव्हील क्लबच्यावतीने उभारण्यात आलेल्या बस थांब्याचे ‘या’ दिवशी  उद्घाटन

<p>इनरव्हील क्लबच्यावतीने उभारण्यात आलेल्या बस थांब्याचे ‘या’ दिवशी  उद्घाटन</p>

कोल्हापूर – इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त "स्वर्ण आभा" उपक्रमांतर्गत सोन्या मारुती चौक येथे  बस थांबा उभारण्यात आला आहे. या बस थांब्याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी ९ जून रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे.

या सोहळ्याला इनरव्हील इंटरनॅशनलच्या ट्रेझरर डॉक्टर रश्मी शर्मा, महापौर रूपाराणी निकम यांच्यासह राज्य परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती इनरव्हीलच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये या प्रकल्पाचे महत्त्वपूर्ण योगदान राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  या पत्रकार बैठकीला रूपाली बाड, विद्या पठाडे, डॉ. विद्युत शहा, दीपा जाधव, रुक्मिणी हेगिष्टे आदि उपस्थित होत्या.